१९ जुलै, २०२४ धुळे : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात एमआयएमच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. धुळे शहर एमआयएमच्यावतीने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. विशाळगडावर जातीयवाद्यांनी प्रार्थना स्थळाची मोडतोड करून वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप यावेळी एमआयएमच्यावतीने करण्यात आला. तसेच, पोलिसांनी दोषींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही यावेळी एमआयएमच्या वतीने करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.