दूध पुन्हा इतक्या रुपयांनी महागणार

दूध पुन्हा इतक्या रुपयांनी महागणार

मुंबईत म्हशीचं सुट्टं दूध ५ रुपयांनी महागणार, १ मार्चपासून नवे दर लागू, मुंबई दुग्ध उत्पादक.संघाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई दूध उत्पादक संघाने १ मार्चपासून मुंबई शहरात म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ५ रुपये दरवाढ जाहीर केली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. एमएमपीएचे अध्यक्ष सी.के. सिंग म्हणाले की, शहरातील ३००० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांकडून विकल्या जाणार्‍या म्हशीच्या दुधाची किंमत ८० रुपये प्रति लिटरवरून ८५ रुपये प्रतिलिटर केली जाईल आणि ती ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहील. सप्टेंबर २०२२ नंतर होणारी ही दुसरी मोठी वाढ आहे. म्हणजेच किरकोळ ग्राहकांना म्हशीचं दूध एक लीटर घ्यायचं असेल तर त्यांना ९० ते ९५ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबईत म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळी म्हशीचे दूध ७५ रुपयांवरुन ८० रुपये करण्यात आलं होतं. त्यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचं बजेट कोलमडलं होतं. एमएमपीएच्या सर्वसाधारण सभेत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. चारा, भुस्सा आणि इतर वस्तूंच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं नाईलाजानं दुधाच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं ते म्हणाले. मुंबईत दररोज म्हशीच्या ५० लाख लीटर दुधाची विक्री होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version