जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
शेतकऱ्यांच्या संपामुळे रस्त्यावर दुधाचे पाट वाहू लागले आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांच्या गाड्यासह दुधाचे टँकरही रोखले. इतकंच नव्हे, तर या टँकरमधील दूध
रस्त्यावर ओतून दिले.
अहमदनगरहून मनमाडकड़े जाणारी दुधाची गाडी शिर्डी बसस्थानकासमोर अडवली. त्या गाडीचं लॉक तोडून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले.
तर, अहमदनगरमध्येही पारनेर तालुक्याच्या निघोच गावात शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर रस्त्यावर रिकामा केला. तसेच पुण्याच्या कडूस गावातही शेतकऱ्यांनी एकत्र येत दूध
रस्त्यावर ओतले.
औरंगाबादच्या पैठण, शिऊरच्या शेतकऱ्यांनीही औरंगाबाद-सोलापूर आणि वैजापूर महामार्गावर दूध ओतले. पंढरपुरात कर्नाटकहून पुण्याला जाणारे 4 टँकर रोखून त्यातलं
दूध रस्त्यावर ओतण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर अक्षरश: दुधाची नदीच अवतरल्याचं चित्र पाहायला मिळाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.