दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, दूध खरेदीत लीटरमागे 3 रुपयांची वाढ

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, दूध खरेदीत लीटरमागे 3 रुपयांची वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दूध खरेदी दरात प्रति लीटर तीन रुपयांनी वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली.

 

गाईच्या दुधाचा खरेदी दर 24 रुपयांवरुन 27 रुपये एवढा करण्यात आला असून, म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 33 रुपयांवरुन 36 रुपये एवढे करण्यात आला. पशु, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने या खरेदी दरातील वाढीला मान्यता दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version