देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अंधेरीत एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात भेसळयुक्त दूध विकणाऱ्या माफियांचा पर्दाफाश झाला आहे.या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दूध माफिया पैशांच्या लोभापोटी दुधामध्ये दुधामध्ये अत्यंत घातक पदार्थांचे मिश्रण करतात आणि लोकांचं आरोग्य धोक्यात टाकतात. डिटर्जंट पावडर आणि साबणाचे द्रावण,युरिया, सिंथेटिक केमिकल्स, रिफाईंड तेल एक लिटर शुद्ध दुधात मिक्स करू टाकतात. तसच दुधात पाणी मिसळून त्याचं प्रमाणही वाढवतात.हेच भेसळयुक्त दूध हजारो नागरिकांच्या घरी पोहोचतं. या भेसळयुक्त दुधाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने अनेकांना धक्काच बसला आहे.
कपासवाडीतील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या गंभीर प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
These people are adding detergent powder, urea, soap & synthetic chemicals to milk. What's the punishment for this crime? > Imprisonment for up to 6 months
> a very low monetary fine We need to bring Capital Punishment for food adulteration. Nothing else will work ! pic.twitter.com/kHmDOYiphe — Anuradha Tiwari (@talk2anuradha) December 27, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.