मिलिंद एकबोटेंच्या ‘त्या’ जामिनावर आज सुनावणी

मिलिंद एकबोटेंच्या ‘त्या’ जामिनावर आज सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. एकबोटेंवर अँट्रॉसिटी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी एकबोटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले.

मात्र, त्यांनी या प्रकरणाची सुनावणी आपल्या समोर घेणं योग्य ठरणार नसल्याचं सांगत सुनावणीला नकार दिला. त्यानंतर एकबोटेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मंगळवारी त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version