मिलिंद एकबोटेंना जामीन नाहीच; न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळली याचिका

मिलिंद एकबोटेंना जामीन नाहीच; न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळली याचिका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दुसऱ्यांदा मिलींद एकबोटे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  गुन्हा रद्द करण्याची मागणी मिलिंद एकबोटेंनी उच्च न्यायालयात केली होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी रोजी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. यादरम्यान त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.

मात्र, मी घटनास्थळी उपस्थितच नव्हतो. तेथील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेजमध्येही मी दिसत नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले असून हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी एकबोटेंनी उच्च न्यायालयात केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version