मिलिंद एकबोटेंच्या संपर्कात असणाऱ्यांची पोलिसांकडून कसून तपासणी

मिलिंद एकबोटेंच्या संपर्कात असणाऱ्यांची पोलिसांकडून कसून तपासणी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दोनदा फेटाळला आहे.  गुन्हा रद्द करण्याची मागणी मिलिंद एकबोटेंनी उच्च न्यायालयात केली होती.

दरम्यान, मिलिंद एकबोटे यांच्या संपर्कात असणाऱ्यांची चौकशी होत आहे. एकबोटे यांच्या संपर्कात असणाऱ्यांचा पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

महिनाभरातील कॉल्स तपासणीतील लोकांची पोलिस चौकशीही करणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी रोजी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. यादरम्यान त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version