राज्यातील शेतकरी संकटात असतानाच तुळजापुरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे मात्र बेजबाबदार वर्तन दिसून येत आहे. जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्याने जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.