जय महाराष्ट्र न्यूज, अकोला
अकोलामध्ये महाराष्ट्र बँकेच्या शाखेत तब्बल 5 लाखांची चोरी झाली आहे. महत्वाचं म्हणजे, CCTV फुटेज तपासल्यानंतर बँकेत चोरी झाल्याचं बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात
आले. 11 वाजता बँक उघडल्यावर 4 चोरटे बँकेत शिरले आणि कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून एकाने थेट रोकड विभागात प्रवेश केला आणि तेथील 5 लाखाची कॅश घेउन
पळ काढला, त्यानंतर एका मागुन एक इतरही तिघे बँकेतून निघुन गेले.
केवळ 5 मिनिटात त्यांनी आपली मोहीम फत्ते केले. पोलीसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. बँक अधिकारी आणि कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे ही चोरी
झाल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. यात बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का ? याचाही पोलीस तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.