अत्यल्प उत्पन्न गटासाठी फक्त 8 तर उच्च उत्पन्न गटासाठी 338 घरं; म्हाडाची लॉटरी नेमकी श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी?

अत्यल्प उत्पन्न गटासाठी फक्त 8 तर उच्च उत्पन्न गटासाठी 338 घरं; म्हाडाची लॉटरी नेमकी श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील 819 घरांसाठी म्हाडा शुक्रवारी 15 सप्टेंबरला जाहिरात प्रसिद्ध करणार आहे.

 

या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गाटासाठी फक्त 8 तर उच्च उत्पन्न गटासाठी 338 घरं असणार आहेत. यामुळे म्हाडाची लॉटरी नेमकी श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

या घरांसाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज करता येणार असून, 10 नोव्हेंबरला लॉटीरीची सोडत आहे.

 

सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका आणि ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

 

अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील 192 सदनिकांचा समावेश आहे.

 

मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण 281 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

 

तर, उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल – मुंबई, तुंगा – पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण 338 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

 

अशी आहे म्हाडाच्या घराची लॉटरी प्रक्रिया

– 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 21 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्जदाराची नोंदणी केली जाणार.

– नोंदणीकृत अर्जदारास 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बदल करता येणार आहे.

– नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 17 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते 22 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

–  17 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत डीडी स्वीकारले जाणार.

– यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

 

कोणत्या गटासाठी किती डिपॉझिट?

अत्यल्प उत्पन्न गट –  15 हजार 336 रुपये

अल्प उत्पन्न गट – 25 हजार 336 रुपये

मध्यम उत्पन्न गट – 50 हजार 336 रुपये

उच्च उत्पन्न गट – 75 हजार 336 रुपये

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version