जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. कारण येत्या बुधवारी म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.. म्हाडाच्या 784 घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होणारंय..काही दिवसांपूर्वी जेव्हा म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघाली, तेव्हा त्यात कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना घरे उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी 50 हून अधिक घरांचा समावेश करण्यात आलाय..अर्ज पडताळणी, पात्र-अपात्रतेची पडताळणी झाल्यावर प्रत्यक्षात घरांची लॉटरी काढण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडेल असा प्राथमिक अंदाज आहे..यंदा म्हाडा सुमारे 784 घरांची लॉटरी काढणार असून अल्प गटासाठी 322, मध्यम गटातील 226, उच्च उत्पन्न गटातील 168 घरांचा समावेश आहे…तसंच यंदा घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.