म्हाडाच्या लॉटरीला जीएसटीचा फटका

म्हाडाच्या लॉटरीला जीएसटीचा फटका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

म्हाडाच्या यावर्षीच्या घरांच्या लॉटरीला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. आधीच घरांची संख्या अपुरी असताना, त्यातच घरांच्या वाढत्या किंमती, म्हाडाच्या फॉर्मवरचा बारा टक्के जीएसटी आणि डिमांड ड्राफ्टच्या कमिशनवर पुन्हा जीएसटी लागणार आहे. त्यामुळे म्हाडामध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झालं.

 

या महिन्यात लॉटरीची तारीख जाहीर करण्यासाठी म्हाडाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण अजूनही म्हाडा ‘तांत्रिक’ अडचणीत अडकल्याने लॉटरीची तारीख जाहीर झालेली नाही. म्हाडाच्या घरांची लॉटरी दरवर्षी सर्वसाधारणपणे मे किंवा जून महिन्यात काढली जाते. पण जुलै महिना निम्मा संपुष्टात आला, तरी यावर्षी घरांची लॉटरी जाहीर झालेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version