जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
म्हाडाच्या घरांच्या लॉटरीचे अर्ज सादर करण्याची मुदत गुरुवारी मध्यरात्री संपुष्टात आली. यंदाच्या लॉटरीसाठी 63 हजार 342 अर्ज दाखल झाले आहेत. आता 10 नोव्हेंबर रोजी घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्यामध्ये भाग्यवंत विजेत्यांना हक्काचे घर मिळणार आहे. म्हाडाने यंदाच्या लॉटरीत 819 घरांचा समावेश केला आहे. या लॉटरीसाठी यंदा 78 हजार 674 अर्ज आलेले आहेत, पण त्यातील 63 हजार 342 इच्छुकांनी प्रत्यक्षात घरांसाठी पैसे भरल्याचे समोर आले आहे. आता अर्जदारांची प्राथमिक यादी 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.