वृत्तसंस्था, मुंबई
म्हाडा घरांच्या आणि गिरणी कामगारांच्या घरांबाबतच्या लॉटरीविषयी कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नसतानाही वेबसाईटद्वारे चुकीची माहिती देण्यात आली. ऑनलाइन अर्ज, नोंदणी अर्जाबाबत चुकीची माहिती 25 वेबसाईटद्वारे देण्यात आलीय. या वेबसाईट्सविरोधात कारवाईसाठी लेखी तक्रार म्हाडाने मुंबई सायबर पोलिसांकडे केली आहे.
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे घरांच्या सोडतीसाठी https://lottery.mhada.gov.in ही वेबसाइट अधिकृपणे उपलब्ध केली आहे. मात्र, तक्रारीत नमूद केलेल्या 25 वेबसाइटवर या लॉटरीबाबत दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली होती. या वेबसाईटद्वारे कोणत्याही प्रकारची आर्थिक उलाढाल होऊ नये या हेतूने मुंबई सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.