मेक्सिकोच्या भूकंपात 119 जणांचा मृत्यू

मेक्सिकोच्या भूकंपात 119 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दक्षिण अमेरीका खंडातील मेक्सिको देशात बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरा दिला आहे.

 

मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको शहरात हा भूकंप झाला आहे.

 

स्थानिक जिऑलॉजीकल सर्व्हेनुसार भूकंपाची तिव्रता 7.1 रीष्टर स्केल असून भूकंपात आतापर्यंत 119 नागरीकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

 

या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्या असून तर अनेकजण या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तर, हा भूकंप 1985 नंतरचा सर्वात विध्वंसकारी भूकंप असल्याचं सांगण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version