मुस्लिम दांपत्याने मराठी आणि संस्कृत भाषेत छापली मुलाची लग्नपत्रिका

मुस्लिम दांपत्याने मराठी आणि संस्कृत भाषेत छापली मुलाची लग्नपत्रिका

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

ज्याप्रमाणे भाषा ही संवाद साधण्याचे माध्यम आहे त्याचप्रमाणे एक संस्कृतीशी बांधिलकी साधण्याचे देखील माध्यम आहे. मुस्लिम समाजबांधवांच्या लग्नपत्रिका या साधारणतः देवनगरी लिपीमधल्या उर्दू भाषेत आणि फारसी लिपीतील उर्दू भाषेत छापल्या जातात.

पण, सोलापुरात एका मुस्लिम जोडप्यानं आपल्या मुलांच्या लग्नाच्या पत्रिका उर्दू इंग्रजीसह, मराठी आणि संस्कृत भाषेत छापली आहे. 

विविध भाषेत पत्रिका छापून या मुस्लिम दांपत्याने महाराष्ट्रीयन संस्कृतीशी आपली नाळ घट्टपणे जोडली आहे. आणि एकात्मतेचा संदेश़ दिला आहे. सध्या सोलापुरात या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version