मुंबई, १५ जून २०२३ , प्रतिनिधी : ‘बिग बॉस मराठी१’ ची विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता चर्चेत आली आहे. मेघ धाडे हिने नुकताच राजकरणात प्रवेश केलाय. मेघाने समाज माध्यमांच्या सहाय्याने याबाबत माहिती दिली. मेघाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
अभिनेत्री मेघा धाडेने अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर काही फोटो सामायिक केले आहेत. या फोटोत मेघा सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रिया बेर्डे हे देखील दिसत आहे. मेघानं समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘नमस्कार वंदे मातरम ! मला आपणास सगळ्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की , तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी माझा आवडता आणि जगातला सगळ्यात मोठा बलशाली पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला आहे. हे मी माझे अहोभाग्य समजते की, काल ज्यांच्या उपस्थितीत माझी प्रवेश प्रक्रिया पार पडली ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत जी पाटील , महामंत्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला. आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छान कामगिरी करून दाखवायची आहे.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.