जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रेल्वेच्या मध्य,हार्बर आणि पश्चिम मार्गवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे, तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते नायगाव अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल.
कल्याण ते ठाण्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाण्यानंतर पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच, रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर दादरऐवजी दिव्यापर्यंत चालविली जाईल. ब्लॉक कालावधीत मुंबईकडे ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास उशिरा धावतील. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी गरज असल्यास घराबाहेर पडोवे, अशा प्रकारच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.