रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार ५ जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.