रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ‘मेगाब्लॉक

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ‘मेगाब्लॉक

मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या – कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे या काळात लोकल विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळ ९.५० ची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. ही मेमू कोपर – दिव्यादरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच ही मेमू दिव्यावरून न सुटता, सकाळी ११.४५ वाजता कोपर ते वसई रोडदरम्यान धावणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.५ ते दुपारी ४.५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेलवरून सीएसएमटीला जाणारी आणि सीएसएमटीवरून पनवेल आणि बेलापूरला जाणारी लोकल सेवा रद्द केली आहे.पश्चिम मार्ग

डाऊन धिम्या मार्गावर

कुठे : मरिन लाइन्स ते माहीम
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत डाऊन धिम्या मार्गावरील लोकल मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version