एनडीएचा दलित चेहरा असलेल्या राम नाथ कोविंद यांना आव्हान देणार मीरा कुमार

एनडीएचा दलित चेहरा असलेल्या राम नाथ कोविंद यांना आव्हान देणार मीरा कुमार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

एनडीएनं दलित चेहरा असलेल्या राम नाथ कोविंद यांना उमेदवारी दिली.

 

पण, त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसनं माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक बिनविरोध होणार नाही.

 

त्यामुळेच कोविंद यांचा उमेदवारी अर्ज भरताना स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा संसदेत हजर होते.

 

एवढंच नाही तर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, रामदास आठवले यांच्यासारखे नेते जातीनं हजर होते.

 

संसदेत दाखल होण्यापूर्वी या सर्वांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले.

 

त्यासोबतच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही हजर होते. यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version