वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्याबाईंचे नाव

वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्याबाईंचे नाव

मुंबई, १  जून २०२३, प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यापाठोपाठ आता बारामतीतल्या वैद्यकीय महाविद्यालयाला आहिल्यादेवींचं नाव देण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं जाणार आहे. याबाबतची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्य सरकारने त्यासंबंधीचं परिपत्रक जारी केलं आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून ही घोषणा करण्यात येत असल्याचे या वेळी महाजन यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा बारामती आणि धनगर समाजाला केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बारामती येथे सन २०१९ मध्ये १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्याला संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले होते

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या संस्थेचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती असे नामकरण करण्यात येत आहे. त्या अनुनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी करावी, असा आदेश परिपत्रकात देण्यात आला आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या ३० वर्षीच्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून प्रचंड शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या अश्या राजमातेच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याचे आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version