वसंतराव नाईक महाविद्यालयात एमबीएचा पेपर लिक

वसंतराव नाईक महाविद्यालयात एमबीएचा पेपर लिक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एमबीएचा ‘अकौटिंग फॉर मॅनेजर’ पेपर फुटला. देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा केंद्रावर होता. दहा ते एक दरम्यान पेपर सुरु होता. अवघ्या सहा मिनिटात पेपर फुटला गेला. ‘फ्युचर मॅनेजर’ या ग्रुपवर पेपरचा स्नॅप बाहेर पाठवण्यात आला होता. बाहेर असलेले दोघे जण झाडाखाली बसून उत्तर लिहित असताना त्यांना शिपायांनी बाहेर पकडले.

१० वाजून १२ मिनिटांनी शिपाई सतीश पवार, हनुमंत कोरडे, रवी गवळी यांनी विद्यार्थ्यांना पकडले. त्यांना पकडून परिक्षागृहातील विद्यार्थ्यांना ट्रेस करण्यात आले. पाठवणाऱ्याचा डीपी ट्रेस केला असता  तो विद्यार्थी नंबर सहामध्ये सापडला. त्याने तत्काळ आपले हॉल तिकीट फाडून टाकले. पकडलेल्या तिघांना प्राचार्यांच्या दालनात ठेवण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आजचा पेपर रद्द केला आहे. सहा केंद्रावर पेपर सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version