सलमान खानच्या घराजवळील शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश

सलमान खानच्या घराजवळील शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ शौचालय बांधले जात असून शौचालय हटवण्याचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.

 

मात्र, सलमान खानच्या घरासमोर असलेल्या शौचालयाच्या मुद्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.

 

सलमानच्या घरासमोर बांधलेले शौचालय नियमबाह्य रितीनं जाणिवपूर्णक बांधण्यात आले असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले.

 

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शौचालय बांधण्यापूर्वी त्याठिकाणी शौचालय बांधणार असल्याची नोटीस लावणे नियमानुसार बंधनकारक असते. मात्र, वांद्र्यातील एच पश्चिम विभागानं

सलमान खानच्या घरापूर्वी शौचालय उभारण्यापूर्वी अशी कोणतीच नोटीस प्रशासनानं दिली नाही.

 

त्यामुळे याविषयावर जाणिवपूर्णक राजकरण केलं जाते असं महाडेश्वर यांनी म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version