महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारे पत्र आले आहे. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांनादेखील धमकवण्यात आले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्रात अश्लील भाषेसोबत शिवीगाळ करण्यात आली आहे. ‘माझ्या दादांच्या नादाला लागू नका, घरच्यांनाही गोळ्या घालून मारू’, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे.

वरळीमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोट झालेल्या घटनेत ४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला असून त्याच्या आई-वडिलांचाही या दुर्घेटनेत निधन झाले. याप्रकरणी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापौरांवर टीका केली. सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात, अशी टीका शेलारांनी केली. यावर महापौरांनी आक्षेप घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहित तक्रार केली. त्यामुळे महापौरांच्या फिर्यादीनंतर ऍड. आशिष शेलार यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाला आहे.

त्यानंतर आता शेलार-पेडणेकर यांच्या वादानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र आले आहे. त्यामुळे आता महापौर कुटुंबासाठी संरक्षणासाठी मागणी करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version