आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मविआकडून मागणी

आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मविआकडून मागणी

पालकमंत्री तानाजी सावंत यांचा पोलीस खाते व इतर खात्यात हस्तक्षेप वाढल्याने मतदारसंघात त्यांची दहशत वाढत आहे. गेल्या ६ महिन्यापासून राज्यात गुंडगिरी वाढली आहे. या गुंडगिरीमध्ये पालकमंत्र्यांचे पुतणे असल्यामुळे याबद्दलची तक्रार कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये घेतली जात नाही. त्यांच्यावर “किरकोळ कलमं लावून त्यांची सुटका केली जाते” असा आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केले आहेत.

“त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी धाराशिव येथील पत्रकार परिषदेत दिली. असून पोलिस आपलं काहीच वाकडं करू शकत नाही, हे लक्षात आल्याने गुंडांचा आत्मविश्वास वाढत जात असल्याचं दिसत आहे. यातूनच १२ जुन रोजी उद्द्ध्व गटाच्या कार्यकर्त्यावर सावंत यांच्या अंगरक्षकाकडून हल्ला झाल्याचा आरोप देखील राहुल मोटे यांनी केला.

यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भेट घेवून तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे मोटे म्हणाले. राष्ट्रवादीने सावंत यांच्याविरोधात उघड भूमिका घेतल्याने पुढील काही दिवसांत मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version