जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या लोअर परेल भागात असलेल्या नवरंग स्टुडिओला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. पण, आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झालाय. तोडी मिल्स कम्पाऊंडमध्ये असलेल्या नवरंग स्टुडिओला रात्रीच्या सुमारास आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि सात वॉटर टँकर्सच्या मदतीने दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. नवरंग स्टुडिओ असलेल्या इमारतीच्या चौथ्या इमारतीवर आग लागली होती. गेल्या 20 वर्षांपासून हा स्टुडिओ बंद आहे. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, स्टुडिओचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकरी करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.