बोईसर तारापूर एमआयडीसीत कंपन्यांना आग लागण्याच सत्र सुरूच आहे. दरम्यान, बोईसर तारापूर औद्योगिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री उशिरा अटोक्यात आली आहे. जवळपास आठ अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली. मात्र, यामध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
पालघरमधील बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही कंपनी रवीना इंडस्ट्रीज पाठीमागे आहे. या आगीत तीन जण गंभीर भाजले असून त्यांना बोईसरमधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे. या कारखान्यात जेव्हा मोठा ब्लास्ट झाला तेव्हा जवळपास सहा ते सात किलोमीटर परिसरामध्ये हादरे बसल्याची माहिती मिळत आहे. भीषण आग असल्यामुळे आजूबाजूच्या कंपन्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
केमिकल कारखान्यांमध्ये टँकर शिरल्यानंतर एका सिक्युरिटी गार्डने स्टो पेटवल्यानं भडका उडून केमिकल टँकरला आग लागून भयंकर स्पोट झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये तेथील गोडाऊनला भीषण आग लागली असून यामध्ये तिघेजण भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बोईसरच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.