साखर कारखान्यात भीषण स्फोट

साखर कारखान्यात भीषण स्फोट

शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोठी आग लागली होती. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. त्यासाठी मोठी यंत्रणा राबविण्यात आली. शेवगाव तालुक्यात हा खासगी साखर कारखाना आहे. तेथे इथेनॉल प्रकल्पही चालविला जातो. त्या प्रकल्पातच शनिवारी सायंकाळी ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच नगर जिल्ह्यासह शेजारील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही आग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. आग लागली तेव्हा कामगार कामावर होते.

आगीच्या ज्वाळांचे उग्ररुप इतके भयानक होते की, आगीचे लोळ आसपासच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील गावामध्ये दिसून आल्या. कारखाना प्रशासनाकडून मिळालेल्या‎ माहितीनुसार कोणत्याही प्रकारची‎ जीवितहानी झालेली नाही. हा कारखाना औरंगाबादचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उद्याेगपती पद्माकर मुळे यांचा आहे.‎ शेवगाव तालुक्यातील पैठण सीमा हद्दी‎ जवळच असलेल्या नजीक बाभूळगाव‎ येथील गंगामाई साखर कारखान्यात‎ नेहमीप्रमाणे डिस्टिलरी प्रकल्पात‎ कामगार काम करीत असताना अचानक‎ स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला.‎ यावेळी कारखान्याला भीषण आग‎ लागल्यामुळे कामगारांनी आपला जीव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुठीत धरून घटनास्थळावरून धावाधाव‎ सुरू केली.

पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे वाढते प्रमाण, दरम्यान टाक्यांचे होणारे स्फोट लक्षात घेऊन, पोलिसांनी कारखाना स्थळाच्या परिसरातील आसपासच्या तीन ते चार किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या‎ वेळी इथेनॉलच्या टाकीचा स्फोट‎ झाला. आवाज आल्यामुळे सर्व जण‎ बाहेर निघाले. प्रकल्पातील ३२‎ लोकांपैकी दोन जणांना मुक्का मार‎ लागला. त्या दोघांनाही शेवगाव‎ येथील रुग्णालयात दाखल करण्यात‎ आले आहे. यातील ३० जण सुखरूप‎ बाहेर निघाले आहे.‎

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version