जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापिठातील परिक्षांचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय. सलग दुसऱ्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांचं परिक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आलं होतं.
तर, काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर चुकीचा पत्ता छापला गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचीत राहावं लागलंय.
विद्यार्थी परीक्षाकेंद्रात पोहचले. त्यांना एखाद्या खुराड्या प्रमाणं जमिनीवर बसून पेपर लिहावे लागले. त्यामुळं औरंगाबाद विद्यापिठातील गोंधळ संपणार तरी कधी असा सवाल विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून विचारण्यात येतोय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.