परदेशात मराठी गाण्याची धूम

परदेशात मराठी गाण्याची धूम

मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला ”महाराष्ट्र शाहीर” हा सिनेमा येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.अभिनेता अंकुश चौधरी यानं सिनेमात शाहीरांची प्रमुख भूमिका साकारली आहे तर सना शिंदे हिनं शाहीरांची पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं असून त्यातील हुक स्टेपवर अनेकजण रील बनवताना दिसून येतात.मात्र हे गाणं आता फक्त महाराष्ट्रातच लोकप्रिय नसून साता समुद्रा पार देखील लोकप्रिय झालं आहे.

प्रसिद्ध रिल स्टार असलेले किली आणि त्याची बहिण निमा पॉल हे देखील याच गाण्यावर थिरकले आहेत. रिकी आणि निमा पॉल हे अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स व्हिडीओ बनवून समाज माध्यमांवर सामायिक करताना दिसून येतात.पण आता दोघे मराठी ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसून येतायत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर बराच व्हायरल होत असून, त्यांचा हा व्हिडिओ अंकुश चौधरी, सना शिंदे आणि केदार शिंदे यांनी त्यांच्या समाज माध्यमावर शेअर केला आहे.

किली आणि निमा यांना मराठी भाषा येत नसली तरीही त्यांनी उत्तम लिपसिंग केल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याचं कमेंट्स मध्ये भरभरून कौतुक केल आहे.”बहरला मधुमास हा नवा” हे गाणं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे तर बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने हे गाणं गायिलं असून या गाण्याचं नृत्य दिगदर्शन कृती महेशने केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version