Maratha Aarakshan : तरुण आंदोलकावर ओढवलं संकट; दैव बलवत्तर म्हणून बचावला, झालं असं की…

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.
Maratha Aarakshan :  तरुण आंदोलकावर ओढवलं संकट; दैव बलवत्तर म्हणून बचावला, झालं असं की…

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, मराठा आंदोलक मुंबईत दाखल होण्यापूर्वी जुन्नरमध्ये एका आंदोलकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. सतीश देशमुख असं या आंदोलकाचं नाव होतं. पुन्हा एकदा दुर्दैवी घटना होताहोता वाचली. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या मराठा आंदोलक तरुणाला सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये विजेचा धक्का बसला. सुदैवाने तो या घटनेतून तरुण बचावला आहे. 

हेही वाचा : Manoj Jarange Patil: 'सरकारनं तत्काळ जीआर काढावा, अन्यथा राज्यातील एकही मराठा…'; जरांगेंच्या मागणीवर समिती परतली, आझाद मैदानावर नेमकं काय घडलं?

नवनाथ असं वीजेचा धक्का बसलेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला होता. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये असताना त्याला विजेचा धक्का बसला. मात्र, वेळीच त्याला वाचविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे सिडकोने आंदोलकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version