जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात भाजपाला इशारा देणारे पोस्टर्स झळकताहेत. मराठा युवा क्रांती मोर्चानं हे पोस्टर्स लावलेत.
‘हुकलेलं शतक हा इशारा समजा. महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड होईल.
तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा’ असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आलाय.
गुजरातच्या निकालामध्ये भाजपला 99 जागांवर आपलं वर्चस्व राखता आलं. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी 150 जागा मिळतील असं भाकित वेळोवेळी केलं होतं. त्यामुळे मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.