एक मराठा, लाख मराठा; मुंबईत भव्य #मराठाक्रांतीमोर्चा

एक मराठा, लाख मराठा; मुंबईत भव्य #मराठाक्रांतीमोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा मोर्चाचं वादळ अखेर मुंबईत धडकले आहे. भायखळा राणी बाग येथून मराठा मोर्चाला सुरवात झाली आहे.

आझाद मैदानात या मोर्चाची सांगता होणार आहे.

सांगली, सातारा, सोलापूर येथील मराठा आंदोलकांनी मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेल्फी पॉईंटसमोर काळा झेंडा फडकवत सरकारचा निषेध

केला आणि बुधवारच्या मोर्चाचे रणशिंग फुंकले. 

#मराठाक्रांतीमोर्चा चे – live update   

 

– शिक्षणात मराठ्यांना प्राधान्य आवश्यक

– सरकारनं आरक्षणाबाबत योग्य नियोजन आखणं गरजेचं

– सरकारने मराठ्यांच्या भावनांचा विचार करावा – नारायण राणे

– राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर मोर्चेकऱ्यांमध्ये जल्लोष

– कोपर्डी खटल्याबाबत लवकरच अंतिम निकाल येईल- मुख्यमंत्री

– प्रत्येक जिल्ह्याच हॉस्टेलसाठी 5 कोटी देणार- मुख्यमंत्री

– मराठा वर्गाला 60 टक्के गुणांची अट काढली

– शिवसेना आणि मनसेचे बॅनर मोर्चेकरांनी फाडले

– सभागृहातून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

– सरकारने भूमिका स्पष्ट करावी- राधाकृष्ण विखेपाटील

– मुख्यमंत्री आणि #मराठाक्रांतिमोर्चा शिष्टमंडळाची बैठक संपली

– सभागृहात #मराठाआरक्षण च्या विषयावर निर्णय घेण्याची मागणी

– मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांच्या प्रयत्नांना शरद पवारांच्या शुभेच्छा

– मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवदेन

– ओबीसींना मिळणारी सवलत मराठ्यांनाही मिळणार- मुख्यमंत्री

– #मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार अनुकूल- मुख्यमंत्री –

– #मराठा आरक्षणाचं प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे – मुख्यमंत्री

– 605हून जास्त अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती लागू- मुख्यमंत्री

– मराठा आंदोलकांच्या मागण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

– मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सुपूर्द, शासनाच्या उत्तराविना मैदान न सोडण्याचा इशारा

– संभाजी राजे यांच्यासह शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नारायण राणे, धनंजय मुंडे, बैठकीला उपस्थित

– 6 मुलीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीस

– मराठा मोर्चा शिष्टमंडळ विधानभवनात दाखल 

– मराठा मूक मोर्चा आझाद मैदानात दाखल

– काँग्रेस नेते नारायण राणे आझाद मैदानात दाखल; नितेश राणे आणि निलेश राणेही मोर्चात सहभागी

– मोर्चेकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

– विरोधक आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना

– विरोधक मराठा मोर्चात सहभागी होणार

– काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना

– मराठा आरक्षणावरून विधिमंडळात गोंधळ

– सभागृहात सत्ताधारी – विरोधक आमनेसामने

– विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब

– मुंबईत धडकणार मराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ

– जिजामाता उद्यान ते आझाद मैदानदरम्यान रेकॉर्डब्रेक मोर्चाचा इरादा

– मराठा मोर्चात मुंबईचे डबेवालेही होणार सहभागी; आज डबेवाल्यांची सेवा राहणार बंद

– दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या शाळांनाही सुट्टी

– मुंबईतल्या मराठा मोर्चासाठी राज्यभरातून मराठे दाखल.. सकाळच्या पहिल्या ट्रेनही झाल्या फुल्ल 

– मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी… अप्पर पोलीस महासंचालकांचे वाहतूक विभागाला आदेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version