जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
मराठा आरक्षणासाठी सोमवारी सोलापूरात बंद पुकारण्यात आला होता मात्र या बंदला हिंसक वळण लागले आणि दगडफेक करण्यात आली. आंदोलनात दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. सोलापूर बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करणाऱ्या 42 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तर 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या दगडफेकीत 2 पोलीस आणि एका खासगी वाहनाचे तर 2 हॉटेलचेही नुकसान झाले आहे. बंद दरम्यान शहरात 3 ठिकाणी टायर जाळण्यात आले आहेत. 100 टक्के बंद असताना बंद ला गालबोट लागल्याचे सांगत कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई
चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण…
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय नाही – मुख्यमंत्री
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.