भारताची मानुषी छिल्लर ठरली ‘मिस वर्ल्ड 2017’

भारताची मानुषी छिल्लर ठरली ‘मिस वर्ल्ड 2017’

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताच्या मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकलाय. चीनमध्ये रंगलेल्या ‘मिस वर्ल्ड 2017’ या जागतिक सौंदर्य स्पर्धेत एकुण 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.

विशेष म्हणजे तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीनं हा मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. या विश्वसुंदरी स्पर्धेत ‘मिस इंग्लंड’ स्टेफनी हिल दुसऱ्या स्थानी तर ‘मिस मेक्सिको’ अॅण्ड्रीया मेझा तिसऱ्या स्थानी विजयी ठरलीये.

या स्पर्धेत मानुषीला प्रश्न विचारला गेला होता की ‘कुठल्या क्षेत्रात महिलांना जास्तीत जास्त पगार मिळायला हवा ?’ त्यावर उत्तर देतांना ‘मुलांचं पालन पोषण करणाऱ्या आईला जास्त पगार नव्हे तर सन्मान आणि भरपूर प्रम मिळायला हवं’ असं उत्तर देत तिनं ज्युरीची मनं जिंकत हा सर्वोच्च सन्मान पटकावलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version