जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘मंत्रालय की आत्महत्यालय?’ असा प्रश्न उपस्थित होण्याइतक्या आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचा घटना गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात घडल्या आहेत. हीच धोक्याची घंटा लक्षात घेऊन मंत्रालयात जाळ्या बसवण्यात येत आहेत.
मंत्रालयात होत असलेल्या आत्महत्यांच्या घटना लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय आखण्यात आला आहे. मंत्रालयाच्या इमारतीला जाळ्या बसवण्याचं काम सध्या सुरु आहे. गेल्या आठवड्यात एका तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती…
हे मंत्रालय आहे की सर्कसचा फड? अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.