पावसाची वाट पाहणाऱ्यांना खुशखबर; अखेर अंदमान बेटावर मान्सून दाखल

पावसाची वाट पाहणाऱ्यांना खुशखबर; अखेर अंदमान बेटावर मान्सून दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यभरात वेगवेगळ्या भागांत वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना मान्सूनही अंदमानात दाखल होणार आहे.

 

दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेटांवर येत्या 72 तासांत मान्सून दाखल होईल असे हवामान विभागाने म्हटले.

 

हवामानाच्या ‘डायनॅमिक’ प्रकारच्या प्रारूपांनी नोंदवलेली निरीक्षणे आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रक्रिया यांवरून ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने हा अंदाज वर्तवला.

 

गेल्यावर्षी 18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता. यंदा दर वर्षीपेक्षा दोन दिवस आधीच मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version