भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला अटक

भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे सध्याचा ट्रेन्ड झाला आहे. लग्न न करता दोघेही एकमेकांसोबत राहतात आणि आयुष्याचा आनंद लुटतात. पण, सगळेच ते निभावतात असे नाही.

 

भोजपुरी सिनेमातील प्रसिध्द अभिनेता मनोज पांडेवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवत, सिनेमात काम देणार अशी खोटी आश्वासनं देऊन अनेक तरुणींना फसवल्याचे पिडितेने सांगितले आहे.

 

यासंबंधी मनोज पांडेवर चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी बॅचलर आहे. माझं रिलेशन होतं पण, आता ब्रेक अप झालं आहे. असे म्हणत अनेक नवतरुणींना त्याने आपल्या जाळ्यात अडकवले होते.

 

दरम्यान चारकोप पोलिसांनी मनोज पांडेवर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version