गिरणा नदीला पूर 

कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाने चणकापूर आणि पुनंद प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे.
गिरणा नदीला पूर 

४ ऑगस्ट, २०२४, मनमाड : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाने चणकापूर आणि पुनंद प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत रविवारी पहाटे पासूनच प्रचंड वाढ झाली. यामुळे गिरणा नदी दुधडी भरून वाहत आहे. देवळा तालुक्यातील सावकी-विठेवाडी गावादरम्यान असणाऱ्या गिरणानदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, कोणीही वाहने या मार्गावरून नेऊ नयेत, असे आवाहन देवळा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.    
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version