जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भायखळा जेलमध्ये हत्या झालेल्या मंजुळा शेट्येला न्याय मिळणार का असाच प्रश्न आता निर्माण झाला. कारण ज्या महिला अधिकाऱ्याकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आलीय, त्याच तपास अधिकारी महिला आरोपींना वाचवण्यासाठी पुढे आल्याचं दिसतं.
पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्याकडे मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. पण याच स्वाती साठेंनी हत्याप्रकरणातल्या सहा महिला पोलीस आरोपींना वाचवण्यासाठी वर्गणी गोळा करत असल्याचं समोर आलं. त्यासाठी व्हॉट्स एपचा एक ग्रुप बनवण्यात आला.
ज्यात 500 ते हजार रुपयांचा निधी गोळा करण्याचं आवाहन त्यांनी केल्याचं समोर आलं. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. तसंच जाधव यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं. स्वाती साठे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी हिरालाल जाधव यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.