मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश

मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश

मुंबई, १९ जून २०२३ , प्रतिनिधी : आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेनेत रविवारी प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कायंदे म्हणल्या आहेत की, मुख्यमंत्री यांनी अधिकृत शिवसेनेत प्रवेश दिला अभर मानले. या पुढे काम करत राहणार. २०१९ साली मी सेनेत आले. मी पक्षाची भूमिका भक्कम पणे मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनिषा कायंदे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे मनिषा कायंदे या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटाने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली होती. पक्षाच्या विरोधी कारवाया केल्याचा ठपका मनिषा कायंदे यांच्यावर ठेवत त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर आता आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

मनिषा कायदे यांनी १९९७ साली भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २००९ साली त्यांनी भाजपकडून सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांच्या पदरात निराशा पडली. दरम्यान, २०१२ मध्ये मनिषा कायदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने २०२४ मध्ये त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली. २०१८ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून विधानपरिषदेची निवडणूक लढवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version