मणिपूर प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली सुरू

मणिपूर प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली सुरू

नवी दिल्ली : मोदी सरकारने राज्य सरकारशी समन्वय ठेवून मणिपूर प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच प्रश्न सुटेल असा विश्वास मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी व्यक्त केला. राज्याच्या सीमेवरील भागात हिंसेच्या मोजक्या घटना घडल्या. पण राज्याच्या इतर भागांमध्ये शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्व सुरळीत सुरू आहे. राज्यात बाहेरून येणारे लोंढे आणि अमली पदार्थांचा व्यापार यामुळेच मणिपूरमध्ये काही ठिकाणी कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह म्हणाले. कुकी आणि मैतेई समाज यांच्यातील तणाव दूर करण्यासाठी आवश्क ते उपाय केले जातील, असेही मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version