मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात सेहखन खेड्याजवळ सिंघाट विभागात दहशतवादी हल्ला झाला. आसाम रायफल्सवर अतिरेक्यांचा हल्ला झाला असून या भूसुरुंगात धडाडीचे कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांचे कुटुंबीय इतर चार जवान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शाहिद झाले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
‘मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत’, अशी शोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्यांप्रती व्यक्त केली आहे.
Strongly condemn the attack on the Assam Rifles convoy in Manipur. I pay homage to those soldiers and family members who have been martyred today. Their sacrifice will never be forgotten. My thoughts are with the bereaved families in this hour of sadness. — Narendra Modi (@narendramodi) November 13, 2021
कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी, आणि त्यांचा ६ वर्षाचा मुलगा हे तिघे या हल्ल्यात बळी पडले आहेत. तसेच या तिघांसह चार जवानांना वीरमरण आले आहे. असे एकूण ७ जण मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर अतिरेक्यांचा हल्ल्यात ठार झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.