मणिपूर दहशतवादी हल्ला; कर्नल कुटुंबासह जवान शहीद

मणिपूर दहशतवादी हल्ला; कर्नल कुटुंबासह जवान शहीद

  मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात सेहखन खेड्याजवळ सिंघाट विभागात दहशतवादी हल्ला झाला. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर अतिरेक्यांचा हल्ला झाला असून या भूसुरुंगात धडाडीचे कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्या कुटुंबासह इतर चार जवान शहिद झाले आहेत.

 कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी, आणि त्यांचा ६ वर्षाचा मुलगा हे तिघे या हल्ल्यात बळी पडले आहेत. तसेच या तिघांसह चार जवानांना वीरमरण आले आहे. असे एकूण ७ जण मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर अतिरेक्यांचा हल्ल्यात ठार झाले आहेत.

 पीएमएलएकडून हा दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. १९७८मध्ये स्वतंत्र मणिपूरची मागणी करत या पीएमएलए या संघटनेची स्थापना करण्यात आली. तसेच या दहशतवादी संघटनेकडून मणिपूरमध्ये वारंवार हल्ले करण्यात येतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version