वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय. मोदींबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून ही कारवाई करण्यात आलीये.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणी शंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली होती.
पंतप्रधान मोदी अतिशय नीच व्यक्ती असल्याचे अय्यर यांनी म्हटले. मोदींकडे किमान सौजन्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केले. या राजकारणाची काय गरज होती?,’ असा प्रश्नही अय्यर यांनी विचारला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.