जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ओखी वादळाचा कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा बसला होता त्याचा परिणाम आता पाहायला मिळतोय.
ओखी वादळाचा आंबा उत्पादकांना जबर फटका बसल्याने यंदा आंबा बाजारात येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
ओखी वादळामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे हापुस आंब्याच्या झाडांना अद्याप मोहोर देखील आलेला नाहिये.
त्यामुळे यंदाच्या मोसमात हापुस लांबणीवर पडतोय की काय अशी भीती आंबा उत्पादकांमध्ये पाहायला मिळतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.