हापूस सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर

हापूस सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

फळांचा राजा हापूस आंबा कोकणात रत्नागिरीतल्या स्थानिक बाजारपेठेत दाखल झालाय. मात्र, याचे दर हे सामान्य़ांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम सध्या हापूसच्या उत्पादनावर झालाय. त्यामुळे हे दर वाढलेत. कोकणात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधूनदेखील मोठ्या प्रमाणावर आंबा स्थानिक बाजारात आलाय.

जवळपास पाचशे ते सातशे रुपये डझन दरांनी सध्या हापूसची विक्री स्थानिक बाजारात होत आहे. तर चार डझनाच्या पेटीला तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. एकूणच हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version