ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे पुण्यातील राहत्या घरी रात्रीच्या सुमारास निधन झाले.

 

आज दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

व्यंगचित्राबरोबरच ललित लेख, विविध विषयांवर ते नियतकालिके आणि वर्तमानपत्रात ते  लिहित होते.  

 

मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते.

 

व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरीरिने भाग घेत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली.

 

या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version